Disha Shakti

Uncategorized

माजी सैनिक बी.एल. वाघमारे यांचा नवोपक्रम ! गावच्या स्मशाभूमी साठी पाच गुंठे जमीन दिले दान

Spread the love

देगलुर प्रतिनिधी / ज्ञानोबा सुरनर : बल्लुर गावाची लोकसंख्या दोन हजार च्या जवळ पास असून पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला तर त्या व्यक्तीवर माळरानावर अथवा रस्त्याच्या कडेला , तर शेतात नाल्याच्या कडेला, खडकावर जाळले जात होते त्यामुळे नागरीकांची प्रचंड गैर सोय होत होती ही गैरसोय माजी सैनिक भिमराव वाघमारे यांनी त्यांची मालकीची पाच गुंठे जमीन ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक, ॲड. विधितज्ञ शा.ल. देसाई यांच्या स्मरणार्थ बल्लूर गावच्या स्मशान भूमी साठी देवून येथील गावकऱ्यांची समस्या सोडविली.

बल्लूर या गावासाठी स्मशानभूमीसाठी निधी मंजूर होणे स्मशानभूमीची निर्मिती होणे अपेक्षित होते मात्र अद्याप पर्यंत गावात स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. जागेअभावी तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही, स्मशान भूमीचा प्रश्न सोडवण्या साठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाही यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन माजी सैनिक भिमराव लक्ष्मण वाघमारे यांनी गावावर असलेले प्रेम, निष्ठा गावकरी जनतेबद्दल असलेली आपुलकी ज्येष्ठ स्वांत्र्यसैनिक ॲड. विधितज्ञ शा.ल. देसाई यांच्याकडुन मिळालेली प्रेरणा यामुळे गावचा विकास साधण्याची इच्छा उराशी बाळगून स्वतःच्या मालकीची पाच गुंठे जमीन गावातील ज्येष्ठ स्वातत्र्यसैनिक ॲड. विधितज्ञ शा.ल. देसाई यांच्या स्मरणार्थ अर्पण केले. एकीकडे दोन इत जागेसाठी जीवावर उठणारी माणसे तर शेतीच्या टीचभर जागेसाठी कोर्ट कचेरीच्या भानगडीत आयुष्य घालणाऱ्या लोकासमोर तारुण्यात देशासाठी झिजून, वृद्धापकाळ गावाच्या मातीसाठी इमान राखून माजी सैनिक बी.एल. वाघमारे यांनी एक वेगळा आदर्श गावकऱ्या समोर ठेवला आहे.

त्यांच्या या नवोपक्रमातून बल्लूर गावाची समस्या दूर झाली आहे. आपल्या मालकीची मौजे बल्लूर हद्दीतील गट नं.396 मधील 0.80 आर. क्षेत्रापैकी 0.5 आर. जमीन गावच्या सार्वजानिक स्मशानभूमी साठी कायदेशीर रीत्या दानपत्रा द्वारे ग्रामपंचायतीला लेखी दानपत्र केले. ग्रामपंचायतीने ही जागा सार्वजनिक स्मशानभूमी करीता ताब्यांत घेऊन गावकऱ्यांना अंत विधीसाठी, बोअरवेल, छावणी, सुरक्षाभिंत अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास गावाच्या विकासात भर पडेल असे गावकर्यातून व्यक्त होत आहे. माजी सैनिक भिमराव लक्ष्मण वाघमारे यांच्या या नवीन उपक्रमातून गावाची मोठी समस्या दुर झाल्याने अनेकांनी त्यांचे आभार व्यक्त केले त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!