Disha Shakti

Uncategorized

सर्व पाणी पुरवठा योजनांचे बिल शासनाने भरावे व सर्व बंद योजना त्वरीत चालु करा – सुरेशराव लांबे पाटील

Spread the love

शेख युनुस /अहमदनगर प्रतिनिधी : राहुरी तालुक्यात असलेल्या मुळा धरणातुन अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजणा आहेत या सर्व योजनांना प्रत्येक महिन्याला लाखोंची बिल येतात या सर्व योजना विज बिलाच्या नावाखाली वर्षभरातुन अनेकवेळा 15,15,दिवस विद्युत महावितरणाची अधिकारी बंद करतात याकडे लोकप्रतिनिधी व विद्यमान शासनाच्या अधिकारी व पदाधिकारी हेतुपुरस्कर दुर्लक्ष करतात व या काळात कार्यक्षेत्रातील नागरीकांचे व लहान मुलांचे आरोग्य हेतुपुरस्कर धोक्यात आणतात, सध्या 8 दिवसापासुन बंद असलेली सोनई करजगाव व ईतर योजना त्वरीत चालु करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा ईशारा राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला आह़े.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळऊन 75 वर्षे उलटुन गेली तरी आजही देशातील नागरिकांना अन्न वस्त्र निवारा या मूलभुत गरजांचा अभाव आहे,त्यातच निसर्गाने फुकट दिलेले पाणी देखील या राज्यकर्त्यांनी नागरिकांना सवलतीच्या दरात दिले नाही,आजुनही अनेक गावात पाणी योजना नाही,पाणी हे जीवन समजले जाते मनुष्याच्या आरोग्याची सुरुवात ही पाण्यापासुन होते पाण्यामंध्ये अनेक सुक्ष्म जीवजंतु असतात अनेक आजार अशुद्ध पाण्यामुळे उद्भवतात, त्यामंध्ये संपुर्ण देशामध्ये गेल्या दोन वर्षांपुर्वी कोरोना सारखा भयानक असलेला हा आजार सर्दी खोखला निमोनिया हि सर्व हे लक्षण असलेला आजार हा केवळ अशुद्ध पाणी व पाणी बदल यासारख्या कारणाने होतो अस तज्ञांच्या लक्षात आले,त्यातच राहुरी तालुक्यात व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रात कोरोना काळात अनेक तरुण वृद्ध माता भगिंनी यांची दुर्दैवी निधन झाले, कोणाची आई गेली,कोणाचे वडील गेले,कोणाची पत्नी गेली,कोणाचे पती गेले,कुणाचा तरुण मुलगा,सुन गेली असे प्रत्येकाची अनेक नातेवाईक आपण कोरोना काळात जाताना बघितले तरी नगर जिल्ह्यातील तसेच राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात पुर्वीपासुन चालु असलेले मुळा धरणातुन अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत,व मागील पंचवार्षिक मंधे मंजुर झालेली ब्राम्हणी व इतर 7 गावांची नविन योजनेचे काम चालु आहे, महाराष्ट्र शासन या योजनांसाठी कोट्यावधीचा खर्च करते,या पाणी पुरवठा योजनेचे बिल मिटर प्रमाने दर महीन्याला लाखो रुपये येते व मेंटेनेस पाणीपुरवठा कर्मचारी या सर्व खंर्चाची बेरीज मोठ्या प्रमाणात होते व ग्रामपंचायतींना त्या प्रमाणात वसुल होत व हा सर्व खर्च पेलवत नाही व ह्या सर्व पाणी योजणा विज बिलाच्या नावाखाली प्रत्येक महीन्यात 8 ते 15 दिवस बंद ठेवतात,व ह्या काळात पाणी बदलामुळे राहुरी तालुक्यातील व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रातील नागरिकांची आरोग्य धोक्यात येते या सर्व गोष्टीला या मतदारसंघातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व शासनाचे अधिकारी पदाधिकारी जबाबदार आहे,

तरी मुळा धरणातील सर्व पाणीपुरवठा योजनेची विज बिल HP प्रमाणे द्यावेत किंवा हे बिल महाराष्ट्र शासनाने भरावी व यापुढे कुठलीच पाणीपुरवठा योजना विज बिलाच्या व इतर कारणांनी जास्त वेळ बंद करुन नागरिकांची आरोग्य धोक्यात आनु नयेत व बंद असलेल्या सर्व पाणी योजना त्वरित चालु कराव्यात अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा सुचक इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व सर्वसामान्यांचे नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!