शेख युनुस /अहमदनगर प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगराळ दुर्गम क्षेत्रातील शेतकरीवर्ग हा मोठ्या प्रमाणावर असून वेळेवर विद्युत पुरवठा होत नसल्याने बारामाही शेती होत नव्हती. शेरी चिखलठाण येथे न ऊ ते दहा वर्षापासून दिवसाआड विद्युत पुरवठा होत होता. शेतकरीवर्ग हा शेतीला मुबलक पाणी पुरवठा करू शकत नव्हता,माजी मंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या वेळोवेळी अधिवेशनात शेतकरीवर्गाची बाजू मांडत विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मागणी केली.
शेरी चिखलठाण येथील शेतकऱ्यांना पंधरा वर्षापासून वीजपुरवठ्याची समस्या लक्षात घेता माजी मंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी व लोकनियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 3311 के.व्ही. विद्युत पुरवठा उपकेंद्राला 4 कोटी 20 लाख 31 हजार रूपयांचे नवीन उपकेंद्र मंजूर करत त्या 3311 के.व्ही. उपकेंद्राच्या कामाला सुरुवात केली. शेरी चिखलठाण येथील लोकनियुक्त कार्यसम्राट सरपंच डॉ. सुभाष काकडे पाटील यांच्या योग्य पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना आता दररोज वीजपुरवठा मिळणार असून शेतकरी सुजलाम सुफलाम होणार असल्याने शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील शेतकरीवर्गातून लोकनियुक्त व कार्यसम्राट डॉ. सुभाष काकडे पाटील यांचे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. शेरी चिखलठाण येथील 3311 के. व्ही. विद्युत पुरवठा उपकेंद्राच्या कामाला प्रारंभ झाल्याने त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. यापुर्वी शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीत ताहाराबाद येथून वीजपुरवठा होत होता. शेतकरीवर्ग हा ताहाराबाद येथील दिवसा आड वीजपुरवठ्यामुळे बेजार झाला होता.
अपुऱ्या खंडित विजपुरवठ्यामुळे ट्रान्सफार्मर जळत होते.शेरी चिखलठाण येथील 3311 के.व्ही.विद्युत केंद्रामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केल्याचे दिसत आहे. यावेळी उपस्थित लोकनियुक्त कार्यसम्राट डॉ. सुभाष काकडे ,किसनराव काळनर ढोकेश्वर पतसंस्था संचालक, ईसाकभाई सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरी तालुका अध्यक्ष, संतोष शेठ काळनर भाऊ उद्योग समूहाचे मालक, आबासाहेब काळनर उपसरपंच, निवृत्ती घनदाट ताहाराबाद येथील सरपंच, पप्पू माळवदे उपसरपंच ताहाराबाद,बाळासाहेब भोसले ,अशोक करडे,विजय बाचकर बुथ कमीटी अध्यक्ष,अशोक शिंदे,अशोक काळनर व शेरी चिखलठाण येथील ग्रामस्थ उपस्थित होते.