Disha Shakti

Uncategorized

बिरेवाडी साकूर रस्त्याच्या काम निकृष्ठ दर्जाचे व कामास दिरंगाई होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप!

Spread the love

प्रतिनिधी /शेख युनुस : संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील बिरेवाडी ते साकूर येथील रस्त्याची दुरवस्था बिकट असून ठेकेदाराने अपुऱ्या व निष्कृठ दर्जाने काम करून अपुऱ्या काम करून दिरंगाई होताना दिसत आहे. ‌ सविस्तर माहिती अशी कि,जिल्हा परिषद अंतर्गत एका ठेकेदाराने काम घेतलेले असून त्या कामाकडे कानाडोळा होताना दिसत आहे. बिरेवाडी फाटा ते साकूर येथील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून शेतकरी व शालेय विद्यार्थी ह्या मार्गाने तारेवरची कसरत करून आपल्या दैनंदिन प्रवास करताना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ‌ बिरेवाडी फाटा ते साकूर रस्ता दुरूस्तीसाठी एक कि. मी. डागडुजीसाठी निधी मंजूर झालेला असून एका ठेकेदाराने काम हाती घेत प्रथमतः रस्त्याच्या साईट पट्यांची दुरुस्ती मुरुमाने केली परंतु दिड ते दोन महिने उलटूनसुद्धा येथील कामाकडे या ठेकेदाराने कानाडोळा केला असून अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

‌‌‌ ठेकेदाराने या कामाला कुठल्याही प्रकारचे गांभीर्य न घेता निष्कृठ दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर चालतानी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने ग्रामस्थ हे संतापलेल्या स्थितीत आहे.सदर ठेकेदाराला या कामाविषयी कुठलेल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्यामुळे बिरेवाडी फाटा ते साकूर रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. तात्पुरत्या स्वरुपात मुरुम टाकत कामाचा देखावा केला असून तो देखावा सोडून प्रत्यक्षात काम योग्य व उत्कृष्ट दर्जाने करून कामाला सुरुवात करावी अशी मागणी बिरेवाडी व साकूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळींनी केली असून लवकरात लवकर काम सुरू न केल्यास या विषयी पालकमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!