Disha Shakti

Uncategorized

अहमदनगर माऴीवाडा बस स्थानकात कचऱ्याचे साम्राज्य

Spread the love

विशेष प्रतिनिधी / भारत कवितके : अहमदनगर अंतर्गत असलेल्या माऴीवाडा या बस स्थानकात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निदर्शनास येत होते. अहमदनगर हे एक महाराष्ट्रातील प्रसिध्द ऐतिहासीक शहर असल्याने या बस स्थानकात प्रवाशांची रात्रंदिवस गर्दी असते. परंतु बस स्थानकात सर्वत्र कचरा विखुरलेला दिसतो. कचरापेटीतून कचरा बाहेर पडताना दिसतो. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने बस स्थानकात ठिक ठिकाणी पाणी साचलेले दिसत होते.ते पावसाने पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत होते,प्रवाशी त्यापासून बचाव करीत होते.या बस स्थानकात रात्रीच्या वेळी गर्दुले, भिकारी, दारुडे आश्रय घेऊन बसलेले झोपलेले दिसत होते. प्रवाशी उभे राहिलेले दिसत होते. बस स्थानकात एक प्रकारची दुर्गंधी पसरलेली जाणवत होती.शेड मधील जागेत मोकाट कुत्री जमावाने फिरताना दिसत होती.

प्रवाशांनी आपले बस स्थानक स्वच्छ ठेवावे,या संबंधी वारंवारं येथील ध्वनीप्रक्षेपणावरुन सांगितले जात होते. पण येथील प्रशासनच स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याचे दिसत होते. जाणून बुजून दुर्लक्ष करीत होते. समोरील भिंतीवर ” स्वच्छता असे जेथे,आरोग्य वसे येथे” असे रंगीत मोठ्या अक्षरात लिहीले होते .तिथेच प्रवाशी लघुशंका करीत होते. व येथे लघुशंका केल्यास रुपये ५०० दंड घेतला जाईल.त्या समोर प्रवाशी लघुशंका करीत होते. दंड वसुल कोण करणार?या कारणाने आवारात दुर्गंधी पसरली होती. अहमदनगर बस स्थानक प्रशासन याकडे लक्ष देऊन त्वरीत कार्यवाही करुन प्रवाशांच्या आरोग्याची दखल घेईल अशी आपेक्षा ठेवायला हरकत नाही.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!