Disha Shakti

Uncategorized

कोळेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेत वारली चित्रे काढण्याच्या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत एकदिवशीय वारली चित्रे काढण्याची कार्यशाळा घेऊन शालेय विद्यार्थांना मार्गदर्शन केले. सविस्तर माहिती अशी कि,कोळेवाडी येथील आश्रमशाळेत आदिवासी समाजाची विद्यार्थी असून आदिवासी संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून वारली पेंटिंग विषयी एकदिवशीय कार्यशाळा घेण्यासाठी नाशिक येथील पोलीस दलात असलेले रविराज भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारली पेंटिंग चित्रे काढण्याची कार्यशाळा भरविण्यात आली. ‌

कोळेवाडी येथील सुगी फाऊंडेशन च्या वतीने वारली चित्रे काढण्याची कार्यशाळा आयोजित करून वारली चित्रे ही आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे या विषयी माहिती दिली.वारली चित्रे ही जगभरात ,महाराष्ट्र राज्यात तसेच पालघर, नंदुरबार, अहमदनगर, आदी आदिवासी बहुल भागातील वास्तवीक मानवी समुहाशी कशी निगडित आहे या विषयावर सविस्तर माहिती द्याण्यात आली. ‌ पालघल येथील पद्मश्री जिवा मसे यांनी ही वारली चित्रे काढण्याची कला जगासमोर आणली असून विदेशात सुद्धा या कलेच्या चित्रांची प्रदर्शन भरताना दिसून येत आहे. ‌ भविष्यात अधिकाधिक या कलेला विकसित करण्याची जबाबदारी आपल्या नवीन तरूण पिडीने जबाबदारी घेत आत्मसात करावी ,वारली चित्रे कशी काढतात या विषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. ‌ यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. पुनम घिगे यांची मोलाची साथ मिळाली असून सुगी फाऊंडेशन हा उपक्रम योग्य प्रकारे आयोजन करुन सहकार्य केले. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!