अ.नगर प्रतिनिधी /शेख युनुस : मंत्री, आमदार, खासदार हे आपापल्या मतदारसंघात प्रवास करताना रस्त्यावर काही अडीअडचणीच्या वेळोवेळी मदत करताना नक्की दिसतात. मतदारसंघात कुठलाही प्रतिनिधी हा त्या ठिकाणी धावून जावून सहकार्य करून आपल्या मतदारसंघातील व्यक्तिला मदतीचा हात देतात. परंतु मतदारसंघ नसलेल्या व अनोळखी अज्ञात ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांसाठी कोणी च हात पुढे न देता बघ्याची भूमिका घेताना दिसतात का तर आपल्याला या व्यक्तिकडून कसलाच फायदा नाही म्हणून संकटात अडीअडचणीच्या काळात त्याला राम भरोसे सोडून देतात.लोकप्रिय खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील हे दिल्लीला जाण्यासाठी मुंबईला निघाले असता त्यांना कल्याण येथील रस्त्यावर वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांची चार चाकी गाडी बंद पडली असल्याने त्यांच्या मदतीला कोणीच येत नव्हते कारण रात्री ची वेळ होती परंतू अहमदनगर जिल्ह्यातील खासदार श्री डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी आपले वाहन थांबवून स्वतः त्या ज्येष्ठ नागरिकांप्रती आपुलकी दाखवत कुठल्याही गोष्टीचा विचार न करता धावत जावून त्या चार चाकी कारला मदतीचा हात देत धक्का देत त्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना मदत केली.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या साहित्यांची मोठ्या प्रमाणावर वाटप केलेले आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोवृद्ध योजनेसाठी सर्वाधिक खर्च आणि लाभधारक हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर मेळावे राबविण्यात येते,जनता दरबाराचे आयोजन करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम होते. दौऱ्यात असताना खासदार सुजय विखे पाटील हे वेळोवेळी गाठी भेटि घेतात.