Disha Shakti

Uncategorized

आश्रमशाळा ढवळपुरी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

Spread the love

अ. नगर प्रतिनिधी/ शेख युनूस : स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आश्रमशाळेच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडुळे, शिक्षक लतिफ राजे, वसंत काळे, राजाराम वाघ, संतोष पट्टेकर, श्रीमती मनीषा गर्जे, रशिदा तांबोळी आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक संदीप महांडुळे म्हणाले की महात्मा फुले यांनी मोठ्या कष्टाने समाजोद्धाराचे काम काम केले आहे. प्रत्येक मनुष्याला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी अंधश्रद्धा, कर्मकांड विरोधात लढा उभा करुन न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. स्त्री शिक्षण व बहुजनांच्या शिक्षणाचे जनक म्हणून त्यांच्या कार्याचे स्मरण आपण कायम ठेवले पाहिजे. समाजोन्नत्तीच्या कार्यातून त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणले गेले पाहिजे. याप्रसंगी काही शिक्षक व विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली. यावेळी विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिक्षिका श्रीमती संगीता मोरे, भावना बेरड, सोनाली नारायणे, प्रशांत पादीर, देवका पायमोडे, कृष्णा धुमाळ, सुरजसिंग वाणी, अमोल बांगर, सनी काळे, समाधान भोसरी, संदीप जाटे, रभाजी भागवत, सुरेंद्र पाटील, आप्पासाहेब वाबळे, लाकूडझोडे सर, सुंबे सर तसेच विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आश्रमशाळेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहारांची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!