अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : पारनेर येथील आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संचलित इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलने (ANM) प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. प्रथम वर्ष ए.एन.एम च्या महाराष्ट्र राज्य पॅरावैद्यक व सुश्रुषा मंडळ यांचे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यसह तर ४ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. कु. कोमल सुनील भोर ही ८४.२% मिळवून प्रथम, कु. आकांक्षा संपत गवळी ८२.७% मिळवून द्वितीय, कु. दीक्षा दीपक देठे ८१.७% मिळवून तृतीय व कु. माया नानासाहेब लोखंडे ८०.२% मिळवून विशेष प्राविण्यास उत्तीर्ण झाल्या आहेत तर कु. अपेक्षा खोसे,कु. निकिता खोसे कु. प्रियंका कसबे व कु. श्रद्धा जगदाळे या प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्या आहेत.
नर्सिंग स्कूलच्या स्थापनेपासून निकाल १००% लागत आहे. ग्रामीण भागातील महिला व मुलींना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक जागृती करिता नर्सिंग कोर्सचा फार मोठा हातभार लागल्याची माहिती यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डाॅ. सादिक राजे यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून जी.एन.एम हा पदविका अभ्यासक्रम पारनेर येथे सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला प्राचार्या मनीषा पंडित, शिक्षिका पूनम खोसे, शिक्षिका संध्या औटी यांचे मार्गदर्शन लाभल्याने हे यश प्राप्त झाले. आमदार निलेशजी लंके साहेब, डॉ. सादिक राजे, डॉ. आर.जी.सय्यद, विश्वस्त फहाद राजे यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले.
Leave a reply