प्रतिनिधी / रावसाहेब पाटोळे : नांदगाव येथे जिल्हाभर चर्चेत असलेल्या राज्यातील सर्वात मोठ्या ४०लाभार्थ्यांच्या सामूहिक घरकुल प्रकल्पाला अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) माननीय श्री आशिष येरेकर साहेब व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी श्री किरण साळवे साहेब, नगर पंचायत समितीचे बिडीओ माननीय श्री. श्रीकांतजी खरात साहेब व विस्तार अधिकारी तुपे साहेब त्यांचे सहकारी अधिकारी टीमने भेट दिली व कामाची पाहणी केली. तसेच चालू कामाचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी नांदगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री. सखाराम अण्णा सरक, ग्रामपंचायत सदस्य इंजि.नाथसाहेब सरक, माजी उपसरपंच मच्छिंद्र तात्या पुंड, कॉन्ट्रॅक्टर माननीय श्री.पद्माकर कुलकर्णी साहेब, ग्रामविकास अधिकारी दांगट मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
सीईओ साहेबांनी चालू असलेल्या कामाबद्दल सरपंच सखाराम अण्णा सरक यांचे तोंड भरून कौतुक करून सन्मान देखील केला. आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष सरपंचाची आज प्रत्येक गावाला गरज आहे. असे ते म्हणाले व लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी लागणारे सर्व सहकार्य शासनाकडून आपणास केलं जाईल.
सदरचा प्रोजेक्ट हा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब व खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण होत आहे.असे सरपंच सखाराम सरक यांनी सांगितले.
Leave a reply