Disha Shakti

Uncategorized

सागर भगवान शिंदे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस मध्ये निवड

Spread the love

प्रतिनिधी / अक्षय वरकड : दौंड तालुक्याच्या सीमेलगत असलेलं गाव म्हणजे खानोटा या गावातील तरुण व्यक्तिमत्व कु.सागर भगवान शिंदे या तरुणाची मुंबई येथे लोहमार्ग पोलीस पदासाठी निवड झाली आहॆ.सदरील तरुण फलटण येथील योद्धा करिअर ॲकॅडमी मध्ये पोलीस भरतीसाठी कसून सराव करत होता. सलग चार ते पाच वर्षे झालं तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने याला यशाची पायरी गाठण्यासाठी अत्यंत मेहनत करून गरिबीवर मात करत या तरुणाने न खचता न डगमगता आपल्या कष्टाच्या व मेहनतीच्या बळावर या मुलांने यश संपादन केले आहॆ.

वडिलांचा वारसा नसल्यामुळे व आईच्या कष्टाला किंमत देत व त्याच्या चिकाटीमुळे तो आज या महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट झाला आहे. लहानपणापासून सागर सर्व नातेवाईक व गावातील लोक असतील त्या सर्वांशी तो प्रेमाने वागत असत. याचा खूप मनमिळावू स्वभाव असल्याचे स्थानीक ग्रामस्थ व नातेवाईकांनी सांगीतले लहानपणापासून अभ्यासाची व शिक्षणाची आवड असल्याने तो या शिखरावर पोहोचला आहे. कित्येक वेळा तो स्पर्धा परीक्षा देत असताना त्याला अपयश आल्यानंतर ही खचता डगमगता त्याने सतत आपल्या अभ्यासामध्ये सातत्याचा मार्ग धरला व यशस्वी ठरला व आज़ त्याच्या कष्टाला यश प्राप्त होऊन पोलीस दलात समाविष्ट होऊन आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी मैदानात उतरणार आहॆ.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!