राहुरी प्रतिनिधी / प्रमोद डफळ : माजी राज्यमंत्री बच्चू कडू भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग संघटनेच्या उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागारपदी सलीमभाई शेख तर राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या तालुका सल्लागारपदी बाबुराव शिंदे सर यांची निवड करण्यात आली. सलीम भाई शेख यांनी 2012 पासुन उत्तर जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे साहेब यांच्याबरोबर दिव्यांगाच्या हितासाठी शिबिराच्या माध्यमातून चला घर बांधूया दिव्याची चलाचूल पेटूया दिव्यांगाची चला व्यवसाय उभारव्या दिव्यांगाचे चला अंतोदय कार्ड मिळवून देऊया दिव्यांगाना बरेच उपक्रम राबवले राहुरी तालुका सल्लागार तथा देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष या पदावर कार्यरत होते.
अहमदनगर प्रहार चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा सल्लागार तर ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुराव शिंदे सर यांची राहुरी तालुका सल्लागार पदी निवड करण्यात आली तसेच ब्राम्हणी शाखाध्यक्ष पदी मानिक तारडे ब्राम्हणी शाखा उपअध्यक्ष पदी नानासाहेब हापसे यांची निवड करण्यात आली.
प्रहार चे जिल्हा अध्यक्ष ऍड लक्ष्मणराव पोकळे उत्तरचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सचिव हमीदभाई शेख तालुका समन्वयक ह.भ.प. नानासाहेब महाराज शिंदे ह.भ.प बाळकृष्ण खांदे ह.भ.प आदिनाथ महाराज दवणे ह.भ.प जालिंदर महाराज साळुंखे यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पञ देऊन पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा समन्वयक आप्पा साहेब ढोकणे यांनी आपल्या निवेदक शैलीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची कौतुक केले. यावेळी तालुकाध्यक्ष योगेश लबडे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे तालुका सचिव दत्तात्रय खेमनर तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी महिला अध्यक्षा छायाताई हारदे यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल व गुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी अ.नगर शहराध्यक्ष संदेश रपाडीया अ. नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, संजयजी पुंडसाहेब , श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सचिन शिरसागर, तालुका संघटक भास्करराव दरंदले, तालुका समन्वयक ह.भ.प. नानासाहेब शिंदे महाराज, तालुका संघटक अनील मोरे, राहुरी शहरअध्यक्ष अनामीका हरेल, देवळाली प्रवरा उपअध्यक्ष राजेंद्र सोनवने, सचिव सुखदेव कीर्तने, संपर्क प्रमुख संदिप बोरसे, टाकळीमीया शाखाध्यक्ष सुरेश दाणवे, टाकळीमीया सचिव बाबासाहेब मुसळे, माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव, वाबोरी शाखाध्यक्ष शशिकांत कुऱ्हे, सोमनाथ काळे बा. नांदूर शाखाध्यक्ष , राजेंद्र आघाव, शिवाजी जाधव, प्रतीक धिमते पाटील आदी यांनी निवड झालेल्या पदाधिकारी यांचे कौतुक केले.
Leave a reply