मुंबई कांदिवली प्रतिनिधी / भारत कवितके : पश्चिम कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डा बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ,प्रार्थना करुन कोटी कोटी प्रणाम करण्यात आले.यावेळी समाजात विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचे पदमश्री दादा इदाते व खासदार गोपाळ शेट्टी यांचे हस्ते सत्कार करण्यांत आले,तर संसदरत्न पुरस्कार खासदार गोपाळ शेट्टी यांना व कर्मवीर,पद्मश्री पुरस्कार दादा इदाते यांना मिळाल्याने त्यांचे या जयंती प्रसंगी विशेष सत्कार करण्यांत आले.
![]()
यावेळी आमदार सुनिल राणे ,खासदार गोपाळ शेट्टी व कर्मवीर पद्मश्री दादा इदाते यांनी डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र मधून विचाराचे पालन कार्यकर्ते यांनी आवश्य करावे,त्यांना जातीय व्यवस्थेचा विरुध्द लढताना किती संघर्ष करावा लागला,याबाबत सांगितले. कांदिवली पश्चिम मधील या जयंतीचे आयोजन पंचशील प्रतिष्ठाण ट्रस्ट मार्फत करण्यात आले होते. संजय बाविस्कर,अशोक कांबळे, गजानन गवई, भाऊ पवार, विपुल वोरा,जयदेव जोशी,बाळू अहिरे,उदय पडेलकर, यांनी जयंती चा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता विशेष परिश्रम घेतले. यावेळी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, कर्मवीर पद्मश्री दादा इदाते,आमदार मनिषा चौधरी,आमदार सुनिल राणे, जे.पी.मिश्रा, गणेश खणकर, बाबासिंग,विनोद शेलार, कांदिवली तील नगरसेवक बाळा तावडे,कमलेश यादव,नगरसेविका प्रतिभा गिरकर,प्रियंका मोरे,लिना देहेरकर,निखिल व्यास, रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षिका प्रतिभा पाटील, कांदिवली पोलीस ठाणेचे दिनकर जाधव,कांदिवलीतील पत्रकार व साहित्यिक भारत कवितके, सह इतर महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते, रुण्गाचे नातेवाईक, रुग्णालयाची कामगार कर्मचारि, सुरक्षा रक्षक आदि उपस्थित होते.
HomeUncategorizedकांदिवली पश्चिममध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात संपन्न
कांदिवली पश्चिममध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply