नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी भारताती मध्य प्रदेश -महू येथे झाला. त्यांना भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय ते जागतिक दर्जाचे वकील, समाज सुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते.भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल रोजी महू मध्य प्रदेश येथे एका गरीब कुटुंबात झाला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व, अन्यायाचा निर्भय शत्रू, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचा कैवारी, धुरंधर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी, शिक्षणासाठी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरु मंत्र जनतेला देणारे डॉ.बाबासाहेब (भीमराव) रामजी आंबेडकर यांचा जन्मदिन आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी वाखारी येथे वाखारी गावचे सरपंच श्री काशिनाथ अभिमन्यू सोनवणे, उपसरपंच, पोलीस पाटील., नांदगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आद मोठा भाऊ सोनवणे, वाखरी येथील भीम ज्योती क्रांती मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व वाखारी समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून, महामानवास अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वाखरी गावातील समाज मंदिर समोरील जागेचे व गावातील गल्ली रस्त्यांचे नूतनीकरण झाल्याचे पहावयास मिळाले .