पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ढवळपुरी येथील प्राध्यापक श्री.मनोज देवकाते अध्यापनाचे काम करत असतात व त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात जन्म ढवळपुरी सारख्या दुर्गम भागात शालेय शिक्षण पूर्ण केले. ढवळपुरी येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत असतात व घरच्या कौंटुबिक जबाबदाऱ्या असून देखील तीन वेगवेगळ्या विषयांमध्ये (शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र व भूगोल) सेट अधिव्याख्याता परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवित यश संपादन केले याचा सार्थ अभिमान आहे.
मागील बारा वर्षापासून आपण आपल्या बौद्धिक कौशल्याने ढवळपुरी येथील विद्यार्थ्यांना समाजशास्त्र इतिहास व भूगोल विषय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय मनोरंजक व कृतिशील पद्धतीने शिकवत आहेत. भावी तरुणाईला उत्तम यश व जबाबदार नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन करत आहात. तसेच शैक्षणिक क्षेत्रात व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नेहमी सज्ज असतात. आजच्या युगात प्रत्येक गोष्ट शिक्षकाने अद्ययावत करणे गरजेचे आहे याचे तुम्ही सार्थ उदाहरण आहेत. माझ्यासारखेच यश इतरांनाही मिळावे यासाठी नेहमीच तत्पर असतात, तसेच सखोल ज्ञानाची देवाण-घेवाण समाजातील व्यक्तींबरोबर नेहमीच करत असतात. म्हणूनच आपल्या कार्याची दखल घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या विद्यमाने आज आपणास सहाय्यक आयुक्त माननीय राधाकिसन देवढे साहेब यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षक म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
कारण भावी राष्ट्र निर्माण करण्यात आपल्या सारख्या शिक्षकांचे अतुलनीय योगदान आहे याची जाणीव आहे म्हणून आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आपणास सन्मानपूर्वक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्राध्यापक मनोज देवकाते यांच्या यशाचे पारनेरचे आमदार निलेश लंके संस्थेचे अध्यक्ष शाहीद काझी, सचिव रेहान काझी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर तसेच सहकारी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a reply