Disha Shakti

राजकीय

प्रहार जनशक्ती पक्ष ज्या मंडळासोबत असेल त्यांचेच बहुमत  सुरेशराव लांबे पाटील

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस :  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष ज्या मंडळासोबत असेल त्या मंडळाचे बहुमत होईल असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक सन 2023 – 28 या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने स्वतंत्र पॅनल तयार केला असुन, अर्ज भरलेले अनेक उमेदवार प्रहारच्या संपर्कात आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रचार दौरा चालु असुन शेतकरी वर्गातील मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रात गेल्या हंगामात नोव्हेंबर 2022 ला शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच पुन्हा अवकाळी पावसाने थैमान सुरू केले. त्यात शेतक-यांचे कांदा, गहु, फळबाग, भाजीपाला, व ईतर पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, कीटकनाशक औषध व मजूर मशागतीचा झालेला खर्च ही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही.

मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र व निवारा हे अत्यावश्यक असणारे मुलभूत गरजा पुरविणेही अशक्य झाले आहे. रात्रंदिवस कष्ट करून जगाचं पोट भरणारा बळीराजाच्या कुटुंबावर उपासमारीसह आत्महत्येची वेळ आली आहे. या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मात्र सत्ताधार्यांबरोबर विरोधकही दुर्लक्ष करत असल्याची खंत सुरेशराव लांबे यांनी व्यक्त केली. राहुरी बाजार समिती प्रचार दौऱ्यात आम्ही समक्ष नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन पुन्हा शिंदे फडवणीस सरकारकडे पंचनामे करण्याची मागणी केली आहे अशी माहिती माध्यमाशी बोलताना प्रहार चे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी दिली.

परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे विद्यमान सरकारमधील प्रस्थापित व विरोधक मात्र निवडणुक जिंकण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्याच दारात मतांची भीक मागताना दिसत आहे. निवडणुकांमध्ये निवडून येऊन ज्यांना आपली कर्तव्य जबाबदारी समजत नसेल व सांभाळता येत नसेल त्यांनी निवडणूक लढवू नये. अशा बेजबाबदार नेतृत्वावर विश्वास न ठेवता अशा उमेदवारांना मत देऊ नये, असे आवाहन करुन या उमेदवारांना निवडणूक म्हणजे पोर खेळ वाटतो का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या निवडणुकीसाठी सद्य परिस्थितीत ज्या पक्षा बरोबर प्रहार जनशक्ती पक्ष आहे, त्या पक्षाला प्रथम प्राधान्य देऊन योग्य जागा घेऊन निवडणुक लढवावी, अन्यथा तुम्हाला जे मंडळ योग्य वाटत असेल त्यांच्याबरोबर जा, नाहीतर स्वतंत्र लढा असा आदेश आमदार बच्चु कडू यांनी लांबे यांना दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!