Disha Shakti

Uncategorized

चिखलठाण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी /शेख युनूस  : राहूरी तालुक्यातील पश्चिमला असलेल्या शेरी चिखलठाण येथिल जिल्हा प्राथमिक शाळा व शेरी अंगणवाडी क्रमांक 60 या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया थाटामाटात संपन्न करण्यात आली. सर्व प्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले.

या वेळी शिक्षक व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपले विचार व्यक्त केले त्यात त्या म्हणाल्या, भारतातील वर्गलढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे,सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले.

देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.आताच्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यातुन नाही तर पुस्तकातुन विचारात घ्यावे लागणार आहेत तरच त्यांच सार्वभोम राष्ट्रां स्वप्न साकार होणार आहे .

त्या नंतर गावचे लोक नियुक्त सरपंच डॉ.सुभाष काकडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र आभिवादन केले. ज्या पदावर आपण काम करतो ते केवळ सावित्रीबाई फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी योगदान मुळेच त्यामुळे आपण त्यांचे कायम ऋणी असले पाहिजे एवढे बोलून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले . या वेळी उपस्थित अहमदनगर जिल्हा पत्रकार शेख युनूस, उपसरपंच आबासाहेब काळनर, राष्ट्रवादी युवक कार्येकर्ते इसाक भाई सय्यद, विनोद काळनर, संतोष शेठ काळनर, धीरज टेमकर, जमीर सय्यद,शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक रोडे सर, काकडे राजाराम सर, गाडेकर ह.भ.प.महाराज सर, बारवे सर, बाचकर सर, नरवडे मॅडम, तसेच विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका सौ. मंगल काकडे, मदतनीस सौ. बिस्मिल्ला शेख,आणि शेरी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापक वायळ सर, दुधवडे सर, विध्यार्थी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!