Disha Shakti

Uncategorized

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे विचार समाजाने आत्मसात करणे आवश्यक – प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर

Spread the love

प्रतिनिधी / प्रमोद डफळ : अहमदनगर-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे विचार व त्यांनी केलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून, समाजाने ते आत्मसात करून मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व सीएसआरडी समाज कार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त ” सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमात” महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुजनांसाठी योगदान” या विषयावर छत्रपती संभाजी नगर येथील, प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत प्रा. लुलेकर यांचे ‘व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होत. यावेळी ते बोलत होते.

समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला समाज कल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पठारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजय खामकर, डॉ सुधाकर शेलार कवी सुभाष सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा डॉ. लुलेकर म्हणाले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनातील क्रांतिकारी घटना यांच्या जीवनातील संघर्ष, आज आपण त्यांची जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला संविधानिक भारत घडविण्यासाठी व लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी जाती पाती व धर्माच्या भिंती पाडून एकसंघपणे सजगतेने सामाजिक क्रांतीचा रथ गतीमान करण्यासाठी झटले पाहिजे, असे मत प्रा.लुलेकर यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर हे समाजाला प्रेरणा देणारे थोर व्यक्तिमत्व आहेत सर्वांनी बाबासाहेब व महात्मा फुले यांचे विचार वाचले पाहिजे व ते अनुकरणा मध्ये आणले पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक न्यायाची गरज आहे आज खरच समाजा मध्ये सामाजिक न्याय आहे का याचा विचार केला पाहीजे. या महापुरुषांनी सर्व समाजासाठी कार्य केलेले आहे ते आपण समजून घेतले पाहिजे. असे प्रा लुळेकर म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाज कल्याण श्री देवढे, यांनी सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. प्राचार्य श्री पठारे यांनी आपले स्वागत पर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी तर समाज कल्याण कार्यालयाचे श्री तुकाराम कातकडे यांनी आभार व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!