अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनूस : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून संगमनेर पठार भागातील साकूर येथील युवक कार्यकर्ते योगेश किसन खेमनर यांची संगमनेर पठार भागातील युवासेना पदी निवड करण्यात आली. योगेश खेमनर हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंबीर व कट्टर कार्येकर्ते असून त्यांची सर्व सामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर समाजसेवा व न्याय हक्कासाठी नेहमी अग्रेसर असून ते आपल्या व आपल्या देशावरील प्रेम जोपसात आहे. योगेश खेमनर यांच्या संगमनेर तालुकापदी निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन व स्वागत होत आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व युवा सेना सचिव वरुनजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका प्रमुख पदी योगेश खेमनर यांची निवड करण्यात आली.
Leave a reply