कोपरगाव प्रतिनिधी / ईनायत अत्तार : कोपरगाव येथे गोदावरी नदी पात्रात दोन सापांचे मिलन होत असताना किंवा खेळत असताना बागडत असताना काही लोकने ते दृश्य पाहिलं आणि यांना पाहण्यासाठी आफाट अशी गर्दी जमली होती.
या गर्दीतील काही व्यक्ती आरडाओरडा करत होते त्या गर्दीतले एका इसमान पांढरा कापड टाकण्याचा प्रयत्न केला असता त्या सर्प जोडीने त्या इसामावर डंक मारण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आपदा मित्र म्हणून काम करत असणाऱ्या कुमारी सुषमा खिलारी यांनी लोकांना सांगितले असली काही कृत्य करू नका अंधश्रद्धा करू नका या मनोमिलनाला व्यत्यय आणुन यांना काय मिळणार होते.
आपण या आमच्या प्राण्यासांठी कुठे जंगल ठेवली का ? नाही मग ते मोकळ्या जागेत येणारच तरी आपण त्यांना का त्रास देतो? मी सर्वांना एकच सांगते त्या प्राण्यावर प्रेम करा दया करा त्यांच्यावरही उघड्यावर बाहेर पडण्याची वेळ आपणच आणली आहे. शेवटी एकच सांगते मनुष्याने माणूंस म्हणूंन जगा जसं माणसांवर प्रेम करतो तसं प्राण्यांवर ही प्रेम करायला शिका.
Leave a reply