बिलोली प्रतिनीधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यात मोठया प्रमाणात बुरूड समाजाचे लोक राहतात त्यांचा पारंपारिक व्यवसाय बुरूड काम कुठेतरी लोप होत चालला आहे. दैनंदिन जिवनात बांबूचा झाडांपासून तयार होणारे घराघरात वापरली जाणारे बास्केट, सुप, टोपली, दुरडी, ताटवे, चटई, शिडी, झांडु इत्यादी हस्तकलेचे वस्तु बुरूड समाजातील लोक हाताने तयार करून बाजारात विकतात यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो तसेच लग्न समारंभात पण या पारंपारिक वस्तूचा मोठया प्रमाणात खरेदी होत होती.पण आज परिस्थितीत वेळगी आहे. त्या वस्तूची जागा प्लास्टिक ने घेतली सुप, टोपली, दुरडी अनेक वस्तु प्लास्टिकचा वापर करून बनवल्या जातात. त्यामुळे आज बुरूड समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. बांबु दर गगनाला भिडाले आहेत.
बाबु मार्केट मधे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. मिळाले तर व्यापारांकडुन आवाचा सव्वा दरामधे खरेदी करावी लागते. तो दर परवड नाही.त्यामुळे आजची तरूण पीठी या कामाकडे पाठ फिरवत आहे. इतर काम करण्यास पसंती देत आहे. यामुळे हातावर बनवली जाणारी नक्षीदार सुप, टोपली, लुप्त होत चालली आहे. संबधीत विभागाने या कडे लक्ष देऊन या समाजावर आलेले संकट दुर करावे अशी मागणी बुरूड समाज बाधवांकडुन होत आहे.
बांबु पासुन तयार होणारे बास्केट,सुप,टोपली हस्तकाम करणारा पारंपारिक बुरूड समाज आजच्या परिस्थीतीत सापडला संकटात

0Share
Leave a reply