अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या चिखलठाण येथे ड्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया थाटामाटात साजरी करण्यात आली. भीम जयंती साजरी करताना सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चिखलठाण येथील हनुमान मंदिरामध्ये भीम जयंती चे आयोजन करण्यात आले होते. भीम जयंती साजरी करताना भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. भीम गीते, शिव गीतांच्या सुरु तालावर युवक, युवतींनी भीम जयंती साजरी केली.
यावेळी उपस्थित शिवसेना तालूका उपाअध्यक्ष सुभाष बाचकर, उपसरपंच आबासाहेब काळणर, शरद बागुल, गणेश बागूल, आण्णा बाचकर, चंदर तमनर, दीपक काळनर, महादू काळनर, किरण बागुल, धीरज टेमकर, पिरन सय्यद, अल्ताफ शेख, रफीक शेख, अभिजित बागुल, विशाल बागुल, मोना बर्डे, दीदी आहेर, विकास काळन र, संतोष शेठ काळन र, बबलू काळन र, जमीर सय्यद अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख युनूस, आदिक काळनर, आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
Leave a reply