नगर शहर प्रतिनिधी / कुणाल चव्हाण : अहमदनगर : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नगर शहरात येऊन आमदार संग्राम जगताप यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार जगताप यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. त्या आमदाराची उंची माझ्या शर्टच्या दुसऱ्या बटनापर्यंतच आहे. स्वाभिमान विलीन केलेला आमदार नगर शहरात आला. त्यांच्या उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते माझ्या शर्टचे दुसऱ्या बटनापर्यंतच आहेत. त्यामुळे आमची नजरा नजर होत नाही. जर नजर मिळवायची असेल त्यांनी मला सांगावे त्या ठिकाणी मी यायला तयार आहे,’ असं आव्हानही संग्राम जगताप यांनी दिलं आहे.
नगर शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये तरुण व्यापारी जखमी झाले होते. सदर व्यापाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आमदार नितेश राणे हे नगर शहरात आले असता त्यांनी शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल खोचक असे वक्तव्य केले होते. आमदार राणे यांनी मंगळवारी शहराचा दौरा करत गजराजनगर जाळपोळ, रामवाडी मारहाण प्रकरण, बार्शीकर कुटुंबियांवरील हल्ला, कांदा व्यापारी व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती घेत घटनेतील पीडितांची भेट घेतली. त्यानंतर ‘पोलीस अधिकारी मुद्दामहून परस्परविरोधी गुन्हे दाखल करून घेतात. मोजके काही अधिकारी पोलीस खात्याची बदनामी करतात. त्यांना वाचवायला कोण येणार? इथले स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार का? २०२४ जवळच आहे, त्यावेळी या आमदारांचा एकदाच ‘कार्यक्रम’ करून टाकायचा, मी स्वतः प्रचाराला येणार, यांना हिंदूंची ताकद एकदाच दाखवून देणार,’ अशा शब्दात आमदार राणे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, नितेश राणेंच्या टीकेचा समाचार घेताना संग्राम जगताप म्हणाले की, ‘स्वाभिमान विलीन केलेल्या आमदाराच्या कुटुंबाच्या बाबतीत माहिती घेतली तर तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० जुलै २०१६ च्या विधानपरिषद सभागृहामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला होती. त्यांची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आमदाराच्या कुटुंबाचा इति हास काय आहे, ते सर्वांना माहीत आहे. कोणीही अशी भाषा नगर शहरामध्ये वापरण्याची हिंमत करू नये. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आमदार जगताप यांनी दिला आहे.
‘नीतेश राणे यांची उंची माझ्या शर्टाच्या गुंडी एवढी ; वादानंतर संग्राम जगतापांनी उडवली खिल्ली

0Share
Leave a reply