नांदगाव प्रतिनिधी /खंडू कोळेकर : महाराष्ट्रात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व विजेच्या कडकडाटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्याच्या जनावरांवर वीज पडून जनावरे मृत्युमुखी झाल्याच्या घटना घडल्या असून नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वाखारी येथिल शेतकरी आशोक चिमा गोटे यांच्या पन्नास ते साठ हजार किंमतीच्या बैलांच्या अंगावर विज पडून बैल जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने गोटे कुटुंबाची मोठी हानी झाली असून सरकारने प्रशासनाला त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तसेच पि॓पराळे व वाखारी गावांमधे चक्रीवादळ व विजेच्या कडकडाटासह काढणीस आलेल्या कांदा पिकासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तोंडाजवळ आलेला घास अवकाळी पावसामुळे हिसकल्याने पिकांचे तरीत्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून सरकारला केली जात आहे.
नाशिक जिल्ह्य़ात अवकाळीचा पावसाचा तडाखा ; वाखारी येथे बैलाच्या अंगावर वीज पडून बैल ठार

0Share
Leave a reply