अ.नगर प्रतिनिधी /शेख युनूस : राहुरी तालुक्यातील कर्तव्यदक्ष व लोकप्रिय तहसीलदार फासीयोदिन शेख यांची नुकतीच बदली झाली. गेल्या चार वर्षात शेख साहेबांची कामाची व सर्वसामान्य जनतेशी असलेल्या आपुलकी असल्याने कामाला ऊर्जा मिळाल्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम आणि सहकार्य केले असल्याने तो ठेवा आयुष्यातला एक लाख मोलाचं असल्याने तो आयुष्यातला महत्वाचा ठेवा जपेल असे मत व्यक्त केले.
राहुरीतील जनतेच्या आठवणी दाटून येतात व आपल्यावरील जनतेचे प्रेम यामुळे आपल्या नयन आश्रू भरून येतात अशी भावनिक साद तहसीलदार फासीयोदिन शेख यांनी घातली.शेख फासीयोदिन यांनी आपल्या गेली चार वर्ष्याच्या कालावधीत पत्रकार,पोलीस प्रशासन,विध क्षेत्रातील युवक कार्येकर्ते यांच्यात संपर्कात राहत आपल्या राहुरी तालुक्यातील कामाचा शिखर उंचावर नेत आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली.
राहुरी येथील शहरातील शुभ कीर्ती लॉन्स ( तनपुरे ) येथे तसीलदार शेख व प्रांतधिकारी पवार यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थितीत व्यासपीठावर डि. वाय. एस. पि. संदीप मिटके, तहसीलदार उमेश पाटील, नूतन तहसीलदार चंद्रसेन राजपूत, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, नायब तहसीलदार संद्यादळवी, पूनम दडिलें, सचिन औटी, सुधाकर कानडे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब ढवळे, महेंद्र ढोकळे, पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.