नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : राज्याच्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील अंगणवाड्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच लवकरच नर्सरीत रूपांतर होणार आहे. शिक्षण विभागाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात लवकरच ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी वर्ग सुरू होणार आहेत, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ज्युनियर आणि सीनियर केजी चा अभ्यास कसा असणार, पुस्तक तयार कसे होणार, यावर अभ्यास करत आहे. त्यासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. जुनिअर केजी सिनियर केजीचा जो अभ्यासक्रम आहे. त्या संदर्भात NCERT ने काही निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने पुस्तक बनवली जातील.त्या पुस्तकातील अभ्यासक्रम अतिशय सोपा असेल त्यामुळे मुलांना हसत- खेळत अभ्यास करता येईल.
Leave a reply