श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : विभागासाठी नवीन उपविभागीय प्रांत अधिकारी यांनी नव्याने नियुक्ती करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टी श्रीरामपूर यांच्या वतीने बिस्लरी पाण्याची बाटली देत त्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले.सध्याच्या काळात उन्हाची तीव्रता ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.यामुळे उष्माघाताची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.आणि या उष्माघाता पासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पाणी त्यामुळे वेळोवेळी पाणी पीत राहणे अतिशय आवश्यक आहे.बाकी इतर कामे माणूस टाळू शकतो परंतु शासकीय कामे ही टाळण्यासारखी नसतात, अश्या वेळी नागरिक हे शासकीय कार्यालयात जातात. या मध्ये जेष्ठ नागरिक आपल्या जेष्ट नागरिक पेंशन ची कामे घेऊन शासकीय कार्यालयात जात असतात,काहींची शिधापत्रकेची कामे असतील ते नागरिक देखील तहसील कार्यालय अश्या विविध कार्यालयात जातात.
विशेषतः सध्याच्या काळात विविध शाळा,महाविद्यालयाचे प्रवेशप्रक्रिया सुरू आहेत त्यामुळे विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी शासकीय कार्यालयाकडे धाव घेत आहेत.तर याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालये तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय,तलाठी कार्यालय,अश्या विविध शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी स्वच्छ व थंड पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अश्या आशयाचे निवेदन व एक थंड पाण्याची बाटली व बुके देत नवनिर्वाचित उपविभागीय प्रांत अधिकारी सावंत पाटील यांचे अनोखे स्वागत केले.
यावेळी यावेळी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, सचिव राहुल रणपिसे, डॉ. प्रवीण राठोड, बी एम पवार, भरत डेंगळे, डॉ. सचिन थोरात, एडवोकेट प्रवीण जमदाडे, भैरव मोरे, पप्पू जेठे, सुनील मिस्तरी, आदी उपस्थित होते
मी रुजू झाल्या पासून अनेकांनी मला भेटून माझे स्वागत केले,शुभेच्छा दिल्या. परंतु तुम्ही आज भेटायला येताना च नागरिकांच्या हिताचा विषय घेऊन आलात त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक करणं आवश्यक आहे. निश्चितच आपल्या मागणी बाबत चौकशी करून पूर्तता मी करेन.
–उपविभागीय प्रांत अधिकारी सावंत पाटील.
सध्याच्या काळात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व शासकीय, निमशासकीय अश्या कार्यालयात स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.आणि नागरिकांनी देखील उन्हापासून बचाव करण्याचे उपाय योजनांचा अवलंब करावा.
– तिलक डुंगरवाल,जिल्हाध्यक्ष,आप