Disha Shakti

Uncategorized

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / प्रमोद डफळ – माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शना खाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष बापुराव काणे साहेब यांच्या विनंती नुसार दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा चिकित्सक मा. संजयजी घोगरे साहेब यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यातील 14 तालुक्यातील दिव्यांग बांधासाठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर अहमदनगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी 28 एप्रिल पासून प्रत्येक शुक्रवारी तालुका वाईज आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर होत असते परंतु जिल्हा मोठा असल्याने दिव्यांग संख्या भरपूर आहे. म्हणून अतिरिक्त तपासणी दिनांक 28/ 04 /2023 रोजी श्रीगोंदा व पारनेर तालुका, 12/05/2023 रोजी राहता व कोपरगाव तालुका, 19/05/ 2023 रोजी पाथर्डी व श्रीरामपूर, 26/05/2023 रोजी राहुरी व नगर तालुका 02/06/2023 रोजी अकोले व संगमनेर तालुका, 09/06/2023 रोजी नेवासा व शेवगाव तालुका तसेच 16/06/2023 जामखेड कर्जत तालुक्यातील दिव्यांग तपासणी होणार आहे.

तरी ज्या दिव्यांग बांधवांनी नवीन दिव्यांग प्रमाणपत्र काढालेले नाही किंवा ज्यांना नवीन युनिक आयडी कार्ड मिळाले नाही त्यांनी सकाळी 9 ते 12 या वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा . सोबत आधार कार्ड ओरिजनल, रेशन कार्ड, जुने प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब उत्तर अ.नगर चे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे साहेब जिल्हा समन्वय आप्पासाहेब ढोकणे पाटील महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख जिल्हा सचिव हमीदभाई शेख जिल्हा उत्तर अहमदनगर संपर्कप्रमुख नितीन चौधरी जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पोपटराव शेळके व सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील दिव्यांग बांधाची युनिक आयडी कार्ड प्रमाणपत्र व दिव्यांग बांधव तपासणी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!