Disha Shakti

Uncategorized

साई मंदिरात पुष्पहार-प्रसाद नेण्यास संस्थान अनुकूल न्यायालयाच्या मान्यतेनुसार अंमलबजावणी

Spread the love

 

प्रतिनिधी / इनायत आत्तार : साई मंदिरात हार, फुले, गुच्छ व प्रसाद सुरू करण्यास साईसंस्थानच्या तदर्थ समितीने अनुकूलता दर्शवली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी सी.ए. (दिवाणी अर्ज) दाखल करण्यात आला असून न्यायालयाच्या मान्यतेनुसार अंमलबजावणी करण्यात येईल, असे साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संस्थान कर्मचार्‍यांच्या पतसंस्थेमार्फत शेतकर्‍यांकडून फुलांची खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात भाविकांना ही फुले रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.

12 एप्रिल रोजी जिल्हा प्रधान न्यायाधीश तथा साईसंस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी तथा संस्थानच्या तदर्थ समितीचे सदस्य सिध्दाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या समितीने साई मंदिरात हार, फुल, प्रसाद अर्पण करण्यास मान्यता दिली आहे.कोविडमुळे 17 मार्च 2020 पासून मंदिरात हार, फुले, गुच्छ व प्रसाद अर्पण करण्यास बंदी घालण्यात आली होती. कोविडनंतरही बंदी कायम राहिली. ही बंदी उठवण्यासाठी 25 ऑगस्ट 2022 रोजी आंदोलन करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. भाविकांची लूट टाळण्याच्या दृष्टीने फुल विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी महसूल मंत्री विखे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवालानुसार तदर्थ समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. दोन ते तीन महिन्यानंतर आढावा घेवून समितीसमोर अहवाल ठेवण्याचे निर्देशही संस्थान प्रशासनाला देण्यात आले आहेत.

384 हेक्टरवर फुलशेती

शिर्डी येथील फुल मार्केटमध्ये राहाता तालुक्यातील दहा, कोपरगाव तालुक्यातील तीन, संगमनेर तालुक्यातील दोन व श्रीरामपुर तालुक्यातील एका गावातून जवळपास सहाशे शेतकरी गुलाब, झेंडू, सब्जा, शेवंती व गुलछडी यासारखी फुले विक्रीसाठी आणतात. या तालुक्यातील 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती आहे. त्यावर तेथील शेतकरी, मजुर, व्यापारी यांची उपजिविका अवलंबून आहे. शहरात जवळपास 251 फुल विक्रेते व 13 फुल विक्रेते दुकानदार आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!