नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : खतांचा अतिरेक टाळून शेतकऱ्यांनी शेतीचे माती परीक्षण करून आपल्या पिकाला खतमात्रा देणे आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार खतमात्रा दिल्याने खर्च वाचून योग्य त्या मात्रेत सूक्ष्म अन्नद्रव्य, पिकाला योग्य मात्रेत देण्याचे व्यवस्थापन करता येते. अवश्य ते खत मिळालेले उत्पादन आणि गुणवत्ता वाढते. रासायनिक खतांबरोबर कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत यांचा आवश्यकतेप्रमाणे वापर करता येतो.येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक खताचा साठा उपलब्ध असून माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा असे आव्हान राज्याचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
राज्यात सध्या 5 लाख 33 हजार मे.टन युरिया ,29 हजार मे .टन पोटॅश, दोन लाख पंधरा हजार मे.टन डीएपी ,आठ लाख 39 हजार मे.टन संयुक्त खते ,पाच लाख 15 हजार मे . टन सुपर फॉस्फेट ,असा एकूण 21 लाख 31 हजार मे टन खताचा साठा उपलब्ध आहे.म्हणजेच एक एप्रिल 2023 रोजी हा खत साठा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास 50 टक्के आहे.
खरीप हंगामात राज्याला आणखी 43 लाख 13 हजार मे.टन खत साठा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून रासायनिक खताची मागणी मृगाचा पाऊस पडल्यानंतरच वाढते, त्यामुळे खताचे नियोजन एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आले असून राज्यात मुबलक प्रमाणात खत उपलब्ध राहतील, यासाठी कृषी विभाग दक्ष आहे असे, कृषी आयुक्तांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती परीक्षण करूनच खत द्यावी
Leave a reply