Disha Shakti

Uncategorized

नायगाव तालुक्यातील कांडाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांची तुफान हाणामारी; नागरिकांच्या मध्यस्थीने सोडवले भांडण

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : नायगाव तालुक्यातील नरसी सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे कांडाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूलची प्राथमिक शाळेमध्ये दोन शिक्षकांच्या हजेरीपटाच्या वादावरून वाद झाला व एकमेकात सिनेस्टाईल फायटिंग सुरू झाले व लाथा बुक्क्याने मारहाण केल्यानंतर गावातील नागरिकांनी येऊन शिक्षकांचे भांडण सोडवले शिक्षकांच्या या तुफान हाणामारीची चर्चा सध्या परिसरात वायरल होत आहे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांडाळा येथील शिक्षक धानोरकर यांना पाच मिनिटे उशीर झाला म्हणून हजेरी पठावर सही करण्यासाठी गेले असता कानोले शिक्षक यांनी हजेरीपट दिले नव्हते म्हणुन दोघात वाद झाला होता
तेव्हाच वादावरून राग एकमेकांच्या मनात आज त्यांच्या राग आणावर झाला असून दोघांमध्ये सिनिमा स्टाईल सारखी वर्गामध्येच फायटिंग सुरू झाली त्यामुळे नागरिकासह विद्यार्थीही अचंबीत झाले होते.

शिक्षकयांचा भांडणाची चर्चा परिसरामध्ये जोरदार चर्चेला येत असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक यांच्या ,मुलांने आदर्श काय घ्यावा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जर एकमेकांमध्ये वाद करून भांडण तंटे मारहाण करत असतील तर मुलं शिक्षकाकडून काय आदर्श घ्यावा अशी चर्चा सध्या तरी परिसरामध्ये ऐकावयास मिळत आहे.

दिशाशक्तीच्या  प्रतिनिधीने सहशिक्षक धानोरकर  यांना वादाबद्दल  माहिती घेतली असता त्यांचे म्हणणे असे आहे की मागासवर्गीय असल्यामुळे मला जाणून बुजून मुख्याध्यापक व सहशिक्षक कानोले हे जातीय द्वेषतून मला त्रास देत असतात.ह्या पाहिले सुद्धा गावातील दलित कॅन्सर ग्रस्त महिलेस असेच अपशद्ध वापरले होते.

सदरील शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे नियंत्रण कसे नाही?अशी ही चर्चा गावातील नागरिकांन मध्ये होत आहे.सदरील घटनाक्रमाचे वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशी करून संबंधित शिक्षकांवर योग्य ती कार्यवाही करतील का असा प्रश्न असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!