विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार :नांदूर खंडाळा येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास स्विप्ट कार व मोटार सायकल धडकेत मोटार सायकल तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर स्विप्ट कारच्या पलट्या झाल्याने कारमधील तिघे जखमी झाले.
नांदूर व खंडाळा दरम्यान असणाऱ्या शिवरस्त्यानजीक श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर स्विप्ट कार व मोटार सायकल यांची धडक झाली. जोराच्या धडकेमुळे मोटार सायकलचे तुकडे झाले तर स्विप्ट कारच्या पलट्या होवून ती कार रस्त्यालगतच्या इलेक्ट्रिकच्या मेन लाईनला धडक बसून शेतात गेली.
या धडकेत मोटार सायकल वरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील तिघेही जखमी झाले. जखमींना प्रवरा मेडीकल ट्रस्ट येथे रुग्णवाहीकेत पाठविले तर मृत अन्वर महमंद शेख (वय २४) तरुणास साखर कामगार हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले.