श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत आत्तार : आज दिनांक 27/4/2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय श्रीरामपूर , जि, अहमदनगर या ठिकाणी भीम पँथर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य कडून नेवासा रोड ओव्हरब्रिज – हरेगाव फाटा – अशोकनगर फाटा – वडाळा महादेव रोड कॉर्नर ते वडाळा महादेव गाव, बस स्टँड, कॉलेज पर्यंत स्पीड ब्रेकर तयार करणे व वेग मर्यादा फलक (वाहने सावकाश चालवा) बसविण्या बाबत निवेदन देण्यात आले.
नेवासा रोड ओव्हर ब्रीज ते हरेगाव फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालय आहे जसे RTO ऑफिस, पोलिस चौकी, जिल्हा उप रुग्णालय, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह , पेट्रोल पंप, शासकीय अन्न धान्य गोडाऊन , वजन काटे, हॉटेल्स, व मार्केट परिसर आहे. खूप जास्त गर्दी व वर्दळ असलेले ठिकाण आहे. तसेच हारेगाव फाटे ते अशोक नगर फाटे दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असलेले परिसर आहे. पेट्रोल पंप, लग्न कार्यालय, अशोक स्कूल, गॅरेज लाईन व मार्केट परिसर आहे. तसेच अशोक नगर फाटे ते वडाळा महादेव रोड वर देखील लग्न कार्यालय (लॉन्स), छोटे मोठे किराणा मॉल्स, हार्डवेअर मार्केट , फर्निचर कारखाने, फॅक्टरीज, बस स्थानक, गाव परिसर आणि कॉलेज , टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे.
या 4 किलो मिटर चे मार्गात मुख्य चौक चे ठिकाणी स्पीड – ब्रेकर व वेग मर्यादा फलक बसविण्याची तातडीची गरज आहे. या साठी भीम पँथर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राज खान यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय श्रीरामपूर अधिकारी मा. गुजेर साहेबांना मीटिंग घेऊन निवेदन देण्यात आले.
या सर्व बाबी लक्षात घेऊ लवकरात लवकर काम पुर्ण करावे व होणारे अपघात टाळावे अशी विनंती अर्ज केले. व संबंधित अधिकाऱ्यांनी 10 ते 15 दिवसात हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. त्या प्रसंगी भीम पँथर सामाजिक संघटनेचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष इमरान बागवान, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष तन्वीर शेख, तालुका प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत येवले साहेब, तालुका संघटक मतीन शेख उपस्थित होते.
मार्च व एप्रिल या दीड ते दोन महिन्यात भरपूर आपघात झाले. व 4 जणांनी आपले जीव गमावले आहे. व छोटे – मोठे अपघात दर रोज घडत आहे. या सर्व बाबींचा विचार करून हा काम लवकर मार्गी लावण्यात येईल.