Disha Shakti

Uncategorized

राहुरी तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले! तालुक्यातील असंख्य नागरिकांचे छत हरपले

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यासह अनेक पूर्व भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सविस्तर वृत्त असे की सर्वत्र ऋतूंमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडून शेतकऱ्यांचे जगणे निसर्गाने मुश्किल केले आहे.शेतकऱ्याला सरकार जगू दे ना आणि निसर्ग खाऊ देईना अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडातला घास आज निसर्ग हिसकावून घेत आहे. काल झालेल्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रमी वाऱ्या वादळासह रस्त्यांवरती वृक्ष कोलमडले आहेत. मोठ्या वाऱ्या वावदानासह शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या घरांची छते उडून गेली आहे. अनेकांचा निवारा उडून अनेक जण बेघर झाले आहेत. असंख्य नागरिक निसर्गाच्या कोपामुळे हंबरडा फोडत आहे. दोन तासाच्या विक्रमी वादळ वाऱ्यासह नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकविलेले शेतीमाल या निसर्गाच्या कोपामुळे मातीहीन झाले आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज पाणी घेऊन कशीतरी आपली पिके उभी करून आपली उपजीविका भागवत असताना निसर्ग शेतकऱ्याला जगू देईना! अनेक नागरिकांची घराची छते उडून गेली आहे. अशाप्रकारे राहुरी तालुक्यातील राहुरी तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांचं नागरिकांचे कालच्या झालेल्या वाऱ्या वादळाच्या पावसाने मोठ्या प्रमाणात न भरून येणारे नुकसान झाले आहे. नागरिकांनी तातडीने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!