Disha Shakti

Uncategorized

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी नूतनी करण कार्यक्रम जाहीर

Spread the love

 

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरपंच एकत्रित करून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून गावाचा विकासाचा ध्यास घेऊन गेली अनेक वर्ष राज्यभर कार्यरत असलेली सरपंच संघटना असून या संघटनेची प्रदेश कार्येकरणी ची घोषणा ही दिनांक 28 मे 2023 रोजी अहमदनगर मध्ये होणार आहे. कार्येकारणी नूतनीकरण कार्यक्रम दिमाखात होत असून या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व तालूका अध्यक्ष राज्य कार्यकारनी सह सर्व पदाधिकारी मान्यवरांचे पदग्रहण समारंभ बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. नवीन सरपंच आणि जुने काही पदाधिकारी यांना या मध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र राज्यात एक चांगल्या प्रकारचे सरपंच संघटन निर्माण करण्यासाठी दिनांक 13 मार्च 2023 ते 28 मे 2023 पर्येंत महाराष्ट्र राज्यात दौरे नियमित सुरु राहणार आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंचाना विश्वासात घेऊन पदाधिकारी यांची निवड केली जाणार आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य, माजी सरपंच तसेच ग्रामीण तालूका अध्यक्ष, तालूका उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष, सरचिटणीस व संघटक, संपर्क प्रमुख समन्वक निरीक्षक यांच्या अनेक पदाच्या निवडी तालूका पातळीवर होणार आहे, तरी इच्छुक सरपंच यांनी सहभागी राहावे असे आव्हान युवा नेते रोहित संजय पवार,अमोल शेवाळे, जनार्धन चांदणे, रवींद्र पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरपंच अहोरात्र गावात कार्ये करत असतात याची दखल घेऊन मागील काळात अनेक सरपंच यांना सन्मानीत करण्यात आले आहे.ग्रामीण विकासासाठी चळवळीत सहभागी व्हावे असे आव्हान स्वराज सरपंच सेवा सघाच्या वतीने केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!