Disha Shakti

Uncategorized

उष्माघातामुळं पोलिस सावध! आजारी, ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी महत्त्वाच्या सूचना

Spread the love

प्रतिनिधी मुंबईः उन्हाचा पारा दिवसेंदिवस नवनवीन विक्रम करीत असताना, मुंबई देखील उन्हाच्या झळांनी अक्षरशः करपून निघत आहे. अशात वाहतूक पोलिस तळपत्या उन्हात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती माणुसकीच्या भावनेने विचार करतानाच, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक पोलिस सावध झाले आहे. ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय, तसेच दमा, रक्तदाब, मधुमेह असलेल्या पोलिसांना दुपारी १२ ते सायंकाळी पाच या कालावधीत उन्हामध्ये ड्युटी न देता त्यांना कार्यालयीन काम देण्यात येणार आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत वाहनांची संख्या अधिक असून, ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. प्रचंड उन्हामुळे सर्वसामान्यांनाही घरातून बाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थिती कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिस भर उन्हात उभे राहून वाहतुकीचे नियमन करताना आढळतात. पोलिसांना उष्माघाताचा फटका बसू नये, यासाठी पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचवतानाच काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात महत्त्वाची म्हणजे ५५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या पोलिसांना; तसेच दमा, रक्तदाब, मधुमेह, इतर दुर्धर आजार अथवा एखादी शस्त्रक्रिया झाली असल्यास अशा पोलिसांना उन्हात काम देऊन नये. अशा पोलिसांना कार्यालयीन काम द्यावे, असे या सूचनांमध्ये नमूद केले आहेत.

इतर महत्त्वाच्या सूचना
– वाहतुकीच्या नियमनासाठी तरुण, सशक्त पोलिसांची नियुक्ती करणे
– एका ठिकाणी जोडीने पोलिसांची किंवा सोबत वॉर्डची नेमणूक करावी
– दुपारच्या वेळेस कर्तव्याच्या ठिकाणी स्वच्छ पाण्याच्या बाटलीची व्यवस्था करणे
– उन्हाची दाहकता असल्याने प्रत्येकाने न चुकता टोपी घालावी
– छातीत दुखणे, चक्कर आल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात जावे

– वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यावरील पोलिसांची नियमित माहिती घ्यावी


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!