Disha Shakti

राजकीय

राहुरी कृषी उत्त्पन्न बाजार समितीत माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा करिष्मा कायम

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनूस : जिल्ह्यात गाजलेल्या राहुरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहुरीकरानी राष्ट्रवादी चे माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे, अरुण साहेब तनपुरे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी चा दणदणीत विजय.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही मोठया प्रमाणावर रंगली व जोरदार लढत होऊन राष्ट्रवादी च्या जनसेवा मंडळाला ला 18 जागा पैकी 16 जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला आणि भाजप ला म्हणजे विकास मंडळाला फक्त 2 जागेवर समाधान वक्त करावे लागले.

सोसायटी मतदार संघातून सभापती अरुण साहेब तनपुरे हे सर्वाधिक मते मिळवत (814) मतांनी विजयी झाले. दत्तात्रय कवाने (684) मतांनी विजयी झाले.बाळासाहेब खुळे (724), रखमाजी जाधव 696, महेश पानसरे 714,नारायण सोनवणे 663. तर महिला गटातून सुनीता रावसाहेब खेवरे 808, शोभा सुभाष डुकरे 709. सहकारी संस्था विशेष मागास प्रवर्गातून रामदास बाचकर 763,शेतकरी प्रतिनिधी सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून दत्तात्रय शेळके 697,ग्रामपंचायत सर्व साधारण प्रतिनिधी मतदारसंघात शारदा आढाव (458),मंगेश गाडे (478), अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून मधुकर पवार 466,आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून गोरक्षनाथ पवार 443. व्यापारी आडते प्रतिनिधी मतदारसंघातून चंद्रकांत पानसंबळ 308, सुरेश बाफना 312, हमाल मापारी मतदारसंघातून मारुती हारदे,171 मतांनी विजयी झाले.

भाजपच्या 2 जागा घटल्या असून सोसायटी मतदार संघातून भाजपचे सत्यजित कदम व शामराव निमसे हे दोघे विजयी झाले.गत संचालक मंडळात भाजपला चार जागा मिळाल्या होत्या परंतु यावेळी फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले. राहुरी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत 98% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मतदान सुरळीत पार पाडत जनसेवा मंडळाला 18 पैकी 16 जागा मिळवून दिल्या. राहुरी बाजार समितीत एक हाती सत्ता मिळविल्यानंतर तनपुरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!