अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : पारनेर बाजार समितीवर महाविकास आघाडीला यश आले असून कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यात आमदार निलेश लंके यांनी बाजी मारली.पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनल आणि भाजपच्या जनसेवा पॅनलमध्ये सरळ काटे की टक्करची लढत होऊन 18 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत दणदणीत यश संपादन केले.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती प्रशांत गायकवाड यांना सर्वाधिक मते (814) मिळाली. भाजप कडून विद्येमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेतृत्व केले होते. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागा च्या निवडणुकीसाठी 98% मतदान झाले. विजयी उमेदवार सोसायटी मतदारसंघ : प्रशांत गायकवाड (814), अशोकराव सावंत (694), आबासाहेब खोडदे (757), बाबासाहेब तरटे (738,),संदीप सालके (733), रामदास भोसले (738), किसन सुपेकर (679).
महिला राखीव..पंकजा पठारे (923), मेघा रोकडे (784).
इतर मागास प्रवर्ग. गंगाराम बेळकर (829), बाबासाहेब नऱ्हे (789). ग्रामपंचायत मतदारसंघ. विजय पवार (596), किसनराव रासकर (605), भाऊसाहेब शिर्के (507). अनुसूचित जाती जमाती.. शंकर नगरे (592). व्यापारी मतदार संघ.अशोकलाल कटारिया (338),चंदन बळगट (389). हमाल मापाडी. तुकाराम चव्हाण (65).
या नुसार. आगामी लोकसभा व स्वराज संस्था च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील,आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांनी ही निवडणूक प्रतिष्टेची केली होती.या निवडणुकीत आमदार निलेश लंके यांनी बाजी मारत खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर मात केल्याचे दिसत आहे.