नायगाव प्रतिनिधी / साजीद बागवान : तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नायगाव तालुक्यातील सह आदी परिसरातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली तर अनेकांच्या घरावरची पत्रे उडून गेली त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले व अवकाळी पाऊसाच्या गारपिटीचा तडका तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे….
नायगाव तालुक्यात आज दि 25 एप्रिल दुपारी दोन वाजल्यापासून अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावून त्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला नायगाव तालुक्याती अनेक गावांत सह आदी परिसरात जोरदार गारपीट झाली या वादळी वाऱ्यामुळे काही भागातील झाडे तुटून रस्त्यावर पडली तर गोरगरिबांच्या घरावरील टीन पत्रे उडून त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर नायगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिकासह आंबा रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या हळद काढणीचा मोसम सुरू असून बहुतेक भागात हळद शिजवण्याचे काम सुरू आहे.
या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची हळद भिजून तिचे नुकसान झाले आहे अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्या सह पाऊसाने सर्व शेतकऱ्यांची धावपळ उडवीली त्याचे शासनाने तात्काळ पंचनामे करून जमेल त्या पद्धतीने शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रा.रवींद्र चव्हाण यांनी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष माणिक चव्हाण यांच्या वतीने यांनी नायगाव तहसीलदार गजानन शिंदे यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे निवेदनात नमूद केले आहे.
-
यावेळी उपस्थित संजय पाटील चव्हाण नगरसेवक प्र विठ्ठल आप्पा बेळगे नगरसेवक बंटी पाटील शिंदे शहराध्यक्ष युवक काँग्रेस नायगाव साईनाथ चनावार शहराध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस गजानन चौधरी पंडित पाटील सुगावे देवदास पाटील सुगावे बालाजी पाटील शिंदे नवनाथ पाटील जाधव चंद्रकांत आईलवर बालाजी धोते अभिजीत मंगरुळे सुमित पाटील जाधव अतुल मंगरुळे हनुमंत जकले अविनाश मोहिते सुनील शेळगाव पवन पटणे राहुल शेळके बजरंग कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते