अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या मार्गदर्शना खाली नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्व 18 जागांवर दणदणीत विजय मिळाला. अहमदनगर बाजार समितीच्या निवडणुकीत सलग चौथ्यादा महाविकास आघाडीचे नेते जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांना अहमदनगर तालुक्यातील जनतेने नाकारले आणि कर्डीले व कोतकर गटाला 18 पैकी 18 जागा मिळवून दिल्या.
माजी खासदार कै. दादापाटील शेळके अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागासाठी निवडणूक पार पडली.व्यापारी मतदार संघातील 2 जागा अगोदर बिनविरोध झाल्या होत्या.सुप्रिया ताई कोतकर, राजेंद्र बोथरा हे विजयी झाले. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली असून यात 99% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. कर्डीले व कोतकर गटाचे निलेश सातपुते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
सेवा संस्था, ग्रामपंचायत आणि सर्वसाधारण मतदान संघातील मतमोजणी होऊन सोसायटी आदी संस्था यात भाजपचे उमेदवार आघाडीवरच होते. अहमदनगर तालूका कृषी बाजार समितीवर कर्डीले कोतकर गटाने बाजी मारत दणदणीत विजय मिळून महाविकास आघाडी ला पराभूत करून आपला चौकार मारला आणि अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवला.