विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव/मातुलठाण शासनाच्या नवीन धोरणानुसार राज्यातील पहिली वाळूच्या डेपोचे निर्मिती करण्यात आली आहे गेल्या आठ दिवसापासून महसूल विभागाचे अधिकारी या परिसरात ठाण मांडून आहे डेपोचे काम पूर्णपणे झाले आहे 1 मे महाराष्ट्रदिनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पहिल्या वाळूचे 600 रुपये प्रति ब्रास प्रमाणे विक्री करण्यात येत आहे व महसूल विभागाचे अधिकारी यांनी नुसतीच डेपोसह कार्यक्रम स्थळाची भेट दिली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील पहिला डेपो नायगाव येथे तयार झाला आहे दोन हेक्टर जागेवर डेपोची निर्मिती करण्यात आली आहे या संपूर्ण क्षेत्रास तारेचे कंपाउंड करण्यात आले आहे यासाठी संपूर्ण डेपो परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत यासह डेमो मध्ये येण्या व जाण्यासाठी एकूण दोन रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. वाळूचे नवीन धोरण यशस्वी करण्यासाठी महसूल यंत्रणेने कंबर कसली आहे
Leave a reply