बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : शासकिय विश्रामगृह बिलोली येथे दि. २९ एप्रिल रोजी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयदीप दादा वरखिंडे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली नुतन बिलोली तालुका विद्यार्थी कार्यकारणी जाहिर करण्यात आले. तेव्हा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पद नियुक्ती प्रमाण देण्यात आले.
यावेळी विद्यार्थी आघाडीचे बिलोली तालुका अध्यक्ष पदी युवा नेतृत्व साईराज राजेंद्र रुद्रुरकर यांची निवड करण्यात आली तसेच स्वरूप जाधव यांची तालुका उपाध्यक्षपदी तर दत्ता शिंदे कासराळीकर लोहगाव सर्कल प्रमुख पदी, दिग्विजय चव्हाण यांची आरळी सर्कल प्रमुख पदी,आदेश रत्नागिरी यांची कुंडलवाडी शहर अध्यक्षपदी, वैभव सिद्धापुरे यांची तालुका सरचिटणीस पदी निवड घोषित करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बिलोली तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील भेलोंडे व देगलूर शहराध्यक्ष धनाजी जोशी सल्लागार सतीश पाटील धुप्पेकर देगलूर तालुका सचिव बाबुराव पाटील कदम याच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
HomeUncategorizedभारतीय मराठा महासंघाची बिलोली तालुका विघार्थी आघाडी कार्यकारिणी जाहीर; विघार्थी आघाडी बिलोली तालुका अध्यक्ष पदी साईराज रुद्रुरकर
भारतीय मराठा महासंघाची बिलोली तालुका विघार्थी आघाडी कार्यकारिणी जाहीर; विघार्थी आघाडी बिलोली तालुका अध्यक्ष पदी साईराज रुद्रुरकर

0Share
Leave a reply