Disha Shakti

Uncategorized

जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला! जखमी रुग्णास स्वतःच्या वाहनातून नेले हॉस्पीटलला

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.1 मे रोजी सायंकाळी अंदाजे 7 च्या सुमारास गोटूंबे आखाडा येथील शेतकरी गंगाधर खेमनर हे आपल्या शेतातील कांदे काढून झाल्यानंतर सायंकाळी सपत्नीक वावरथ येथून आपल्या घरी गोटूंबे आखाडा येथे नांदूर रोडने राहुरीकडे येत असताना जिल्हा परिषद सदस्य यांच्या घरानजीक रस्त्यावर अचानक डुक्कर आडवे गेल्याने गंगाधर खेमनर व त्यांची पत्नी मोटरसायकल वरून पडून रस्त्याशेजारील दगडावर जाऊन आदळल्याने गंगाधर खेमनर यांना गंभीर दुखापत झाली असता स्थानीक ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना माहिती दिली असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी स्वतः आपल्या स्विफ्ट कारमध्ये अपघातग्रस्तांना बसवून पुढील उपचारासाठी राहुरीला घेऊन निघाले व कुटुंबाला संपर्क करून राहुरीतील श्रीकृष्ण हॉस्पिटल येथे उपस्थीत राहण्याचे सांगीतले.

अपघातग्रस्त गंगाधर खेमनर व त्यांच्या पत्नीवर राहुरी येथे डॉ.गीरगुणे हॉस्पीटल येथे प्राथमिक उपाचार होईपर्यन्त धनराज गाडे हॉस्पीटलमध्येच थांबून राहिले व त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पेशंटची माहिती घेतली असता गंगाधर खेमनर यांना जास्त प्रमाणात मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडे पेशंटला पाठवण्यात आले आहॆ. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खेमनर कुटुंबाच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले आहॆ.त्यांच्या या कार्यातून त्यांची वडील शिवाजीराजे गाडे यांच्या कार्याची प्रचिती दिसून आली असून स्वर्गवासी शिवाजी राजे गाडे यांचे जनसामन्य प्रति असलेले प्रेम व जनसामान्यांच्या मदतीला संकटकाळात धावून जाण्याचा वारसा आज़ धनराज गाडे यांच्या कार्यातून दिसून आला आहॆ.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!