मुंबई प्रतिनिधि / भारत कवितके : धनगर समाज बांधवानो,महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुणे ते इंदौर आयोजीत शौर्ययात्रेत एकजूठीनेसामील व्हा,असे आवाहन धनगर समाजातील पत्रकार, कवि, लेखक, सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी कांदिवली येथील एका सभेत केले.श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या १४ फूट उंचीच्या घोड्यावर स्वार पुतळ्याची भव्य व दिव्य स्वरुपात शौर्ययात्रेचे आयोजन पुणे ते इंदौर शौर्ययात्रा एवं प्रतिमा स्थापन समिती यांनीं केले आहे. ढोलताशाच्या गजरात ,धनगर समाजाच्या गौरवशाली इतिहासाचा जागर करीत,खोबरे भंडार्याची उधळण करीत,’ येळकोट येळकोट जय मल्हार ‘ अशा घोषणा देत ही शौर्ययात्रा निघणार आहे,
रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी पुणे येथील सारसबाग येथे दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा व प्रतिमा पूजन होईल.सोमवार दिनांक ८ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता पुणेहूनशिरुर ,येरवडा,वाघोळी ,अहिल्यानगर अशी शौर्ययात्रा निघेल,मंगळवार दिनांक ९ मे रोजी राहुरी,शिर्डी मार्गे कोपरगाव ला जाईल.बुधवार दिनांक १० मे रोजी मनमाड, मालेगाव, धुळे अशी शौर्ययात्रा निघेल, गुरुवार दिनांक ११ मे रोजी शिरपूर,जुलवानिया मार्गे अंजड(मध्यप्रदेश) अशी शौर्ययात्रा निघेल, शुक्रवार दिनांक १२ मे रोजी ठाकरी मानपूर मार्गे इंदौर येथे शौर्ययात्रा निघेल.
शनिवार दिनांक १३ मे इंदौर येथे दुपारी ३ वाजता शोभायात्रा निघेल,व सायंकाळी ७ वाजता प्रतिमा लोकार्पण सोहळा कनाडियाचौक इंदौर येथे होईल.या शौर्ययात्रा मध्ये जास्ती जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहून समाजाप्रती समाजहिताची भावना जोपासावी.असे आवाहन मुंबई कांदिवली पश्चिम मधील धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार, कवि,लेखक ,सामाजीक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.
HomeUncategorizedसमाज बांधवांनो,महाराजा यशवंतराव होळकर शौर्ययात्रेत सामील व्हा पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन
समाज बांधवांनो,महाराजा यशवंतराव होळकर शौर्ययात्रेत सामील व्हा पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन

0Share
Leave a reply