Disha Shakti

Uncategorized

जाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर,  सुनील गोसावी, चंद्रकला आरगडे, चंद्रकांत पालवे, सह पत्रकारीता पुरस्कार प्रभंजन कनिंगध्वज यांना जाहीर

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / भगवान काळे : राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील ‘जाई’ प्रतिष्ठान ने आपल्या माता पित्यासह सुनबाईच्या पित्याच्या स्मृतीदिनानिमित्त विविध पुरस्कार जाहीर केले आहे सामाजिक बांधिलकी जपत योगदान देत असलेल्या मान्यवरांना यावर्षापासून पुरस्कार देत सन्मानित केले जाणार असून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, चिंचोलीतील जाई प्रतिष्ठान ने यावर्षापासून समाजातील सामाजिक बांधिलकी जपत अतूलनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे यावर्षी साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यात धोंडीराम गणू भोसले स्मृती वांड्मय पुरस्कार आठवणींचा डोह (सूक्ष्म कथात्मक आत्मचरित्र) चे  सुनील गोसावी, अनुसयाबाई धोंडीराम भोसले स्मृती वाड्मय पुरस्कार स्री जाणीवेच्या ग्रामीण कवितेतील विशेष कार्याबद्दल चंद्रकला आरगडे, रामचंद्र मोहन मांजरेकर स्मृती वाड्मय पुरस्कार मोहोर उजेड वाटांवर या कवितासंग्रहाचे चंद्रकांत पालवे तर जाई पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांना जाहीर करण्यात आले आहेत. स्मृतीचिन्ह, शाल, व एक हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे बरोबरच चिंचोली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शाल व सावलीचा आधार असलेला वृक्ष देऊन सन्मानित केले जाणार आहे.

दिनांक २१ मे २०२३ रोजी चिंचोलीत होत असलेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक महाराष्ट्राचे लोककवी प्रशांत मोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार लहु कानडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे, लोकसत्ता संघर्ष चे संपादक प्रकाश साळवे, साहित्यिक भास्कर निर्मळ, उद्योजक दिलिप जगताप यांच्या हस्ते व  उपस्थितीत दिले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले व सचिव पत्रकार बाळकृष्ण भोसले यांनी सांगितले आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!