विशेष प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी बु.मधील विद्यार्थी ओंकार विजय शेंडगे यांची निवड डॉक्टर सी व्ही रमण बालवैज्ञानिक कार्यशाळेद्वारा आयोजित केली व इस्रो सहलीसाठी निवड करण्यात आली आहे .सहल श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश )येथे २० मे ते 30 मे या कालावधीत रॉकेट प्रक्षेपणाचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी आयोजित केली जाणार आहे डॉक्टर सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा ही राज्यस्तरावर आयोजित केली जाते व ही परीक्षा जनसेवा फाउंडेशन अहमदनगर यांच्यावतीने आयोजित केली जाते.
या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या बालवैज्ञानिकांसाठी त्यांची जिज्ञासा वैज्ञानिक दृष्टिकोन संशोधन वृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने संपूर्ण देशभरातून 80 बालवैज्ञानिकांची निवड केली जाते 8 फेब्रुवारी 2023 रोजी या परीक्षेचे संचालक अरुण तूपविरे यांनी छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी बु: च्या विद्यालयांमध्ये विज्ञान कार्यशाळेचे आयोजन केले होते त्यात ओंकार विजय शेंडगे यांची तालुक्यात प्रथम क्रमांकावर निवड झाली हा विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. सामान्य कुटुंबातील, अभ्यासाबाबती नेहमी कडक असणारे ,उच्च विचार असलेले, नेहमी शिक्षणाबाबती जाणीव करून देणारे पालक विजय शेंडगे, यांचे व पाल्याचे विशेष अभिनंदन.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री उत्तम बुधवंत, उपप्राचार्य दादाजी बागुल, विद्यालयातील विज्ञान शिक्षक, सर्व सेवकवृंद विद्यार्थ्यांचे पालक व श्रीगोंदा परीक्षा विभाग प्रमुख श्री के एम पी यांनी प्रेरणा दिली.तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी शेंडगे यांनी विशेष कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पिंपळगाव पिसा येथील ओंकार विजय शेंडगे इस्रोमधील रॉकेट प्रक्षेपण दर्शनाचा साक्षीदार तसेच NMMS परीक्षेमध्ये NT-C प्रवर्गातून तालुक्यात पहिला.

0Share
Leave a reply