Disha Shakti

सामाजिक

महापराक्रमी राजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या पुणे ते इंदौर शौर्ययात्रेचे राहुरीत होणार आगमन; अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते स्वागतासाठी सज्ज

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / भगवान काळे : महापराक्रमी राजा छत्रपती यशवंतराव होळकर यांची शौर्ययात्रा पुणे ते इंदौर अशी जाणार असून या शौर्ययात्रेचे दि.९ मे रोजी सकाळी ९ वा. राहुरी येथे आगमन होत असून कृषी उत्पन्न बाजार समिती समोर या शौर्ययात्रेचे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

स्वागतासाठी मा.आमदार प्राजक्तदादा तनपुरे, मार्केट कमिटीचे सभापती अरूणसाहेब तनपुरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे, श्रीखंडेराया देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, देवळाली प्रवराचे मा.नगराध्यक्ष सत्यजित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, मनसेेचे नितीन कल्हापुरे, मार्केट कमिटीचे संचालक रामदास बाचकर, रासप चे शरद बाचकर डॉ माने मेडिकल फाउंडेशन चे अध्यक्ष स्वप्निल माने माजी उपसभापती गंगाधर तमनर, आण्णासाहेब बाचकर, डॉ.सोमनाथ देवकाते, ज्ञानेश्‍वर बाचकर आदींसह विविध सामाजिक, राजकीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.

महाराजा यशवंतराव होळकर हे इंग्रजांसमोर कधीही शस्त्र न टाकणारे एक महापराक्रमी योध्दे होते. तुमच्या आमच्या स्वाभिमानाची मशाल पेटविणारे महाराज यशवंतराव आपल्याला आजही अभिमानाचे जगणे देवून जातात. त्यांनी दिलेली राजेपणाची ठेव तुमच्या आमच्या संस्कृतीचा अभिमानाचा आणि गर्वाचा ठेवा आहे. ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व निर्माण झालं अशा राजाच्या शौर्ययात्रेला सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ खेडेकर यांनी केले आहे.

या शौर्ययात्रेसाठी पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय तमनर, नानाभाऊ जुंधारे, भाऊसाहेब विटनोर, भारत मतकर, पोपट शेंडगे, अनिल डोलनर, अनिल माने, श्रीकांत बाचकर, कैलास केसकर, संदीप तमनर, संजय गावडे, दत्ताभाऊ बाचकर, आप्पा सरोदे, डॉ. किशोर खेडेकर, भागवत झडे, भागवत खेडेकर, रामा बाचकर, शरद बाचकर, महेश तमनर, डॉ. संदीप बाचकर, बाबासाहेब केसकर, किशोर तमनर, विठ्ठल तमनर, डॉ.मोरे, मेजर मोरे, तमनर पेंटर, आप्पासाहेब नारायण तमनर, कैलास बरे, वसंत पाटोळे, गणेश गिरगुणे, किरण तागड, राजु तागड, प्रकाश नजन, भास्कर मंचरे, रविंद्र हापसे, पत्रकार रमेश खेमनर, शिवाजी शेंडे, उमेश बाचकर, रामदास खेमनर, अनिल माने, शिवाजी खडके, पाटील नाना बाचकर, प्रभाकर बरे, चंद भाऊसाहेब, विशाल सरोदे, ज्ञानदेव भांड, मोहन जोरी, आबा गडधे सर आदींसह समाज बांधव प्रयत्नशील आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!