Disha Shakti

इतर

महावितरण कार्यालयात प्रहारचा ठिय्या ; सायंकाळ पर्यंत विज जोडणेचे आश्वासनानंतर आंदोलन मागे

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / भगवान काळे : देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहमदनगर येथील वाणी वारखडे वस्तीवरील घरगुती वीज ग्राहकांनी विज बिल भरले असतानाही महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून रोहित्र जळालेचे निमित्त सांगुन व शेती पंपाची वसुली चे कारन पुढें करुण या घरगुती ग्राहकांना वेठीस धरले आहे. हा त्या थकबाकी नसलेल्या घरगुती वीज ग्राहकांवर अन्याय असुन त्यांना तातडीने विज पुरवठा केला जावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे सहकार्याने तसेच प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे नेतृत्वाखाली आज देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले.

प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी फॅक्टरी शहर महिला अध्यक्ष रजनीताई कांबळे, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, उपाध्यक्ष गणेश भालके, संघटक प्रभाकर कांबळे, सुनील कदम, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, त्याचबरोबर वाणी वरखडे वस्ती येथील वीज ग्राहक भीमराज वाणी, दगडू वाणी, नितीन वाणी, हिराबाई वाणी, श्रीराम वाणी, बाळासाहेब वाणी, भाऊसाहेब मुसमाडे, रोहित वाणी, साखरबाई वाणी, संगीता वाणी, दत्तात्रय मुसमाडे, लहान बाई वाणी, शुभांगी वाणी, मनीषा मुसमाडे, साक्षी मुसमाडे, सचिन झावरे, दत्ता होले, आनंदराव वाणी, संदीप वरखडे, अरुण वाणी आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रसंगी आंदोलनाचे निवेदन देताना आप्पासाहेब ढूस यांनी म्हटले की, वाणी वरखडे वस्तीवर आठ दिवसांपासून वीज नसल्याने नागरिक हैराण झाले होते जवळच ओढा असल्याने नागरिकांना बिबट्या आणि डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता त्याचबरोबर दम्याचा त्रास असलेल्या नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत असल्याने आणि शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याला अडचणी येत असल्याने तसेच अंधाराचा गैरफायदा घेऊन त्या वस्तीवर दरोडेखोरांची भीती सतावत असल्याने तेथील नागरिकांना घरगुती वीज तात्काळ जोडणे अत्यंत गरजेचे असल्याने आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला तथापि येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ वीज जोडून देण्याचे मान्य केल्याने आम्ही आमचे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे ढूस यांनी सांगितले.

प्रसंगी महावितरणचे देवळाली प्रवरा येथील अभियंता देहरकर साहेब यांनी आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आज सायंकाळपर्यंत तात्काळ सिंगल फेज वीज पुरवठा सुरळीत करून देणार असुन या वस्तीवर कायमची सींगल फेज वीज पुरवठा करणेसाठी कायमची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन तात्पुरते माघारी घेत आप्पासाहेब ढूस यांनी उपस्थित सर्व महावितरण चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच वाणी वरखडे वस्तीवरील सर्व नागरिक आणि प्रहार चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!