Disha Shakti

Uncategorized

ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधि / मिलिंद बच्छाव : विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदयसम्राट ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाळासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड ( दक्षिण ) जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे घुंगराळेकर व जिल्हा सचिव बालाजी गायकवाड रातोळीकर,नायगाव ता. महासाचिव साहेबराव कोपरेकर ,तालुकाध्यक्ष सतिश वाघमारे , प्रभाकर घंटेवाड , महिला तालुकाध्यक्षा रेखाताई देवकर जिल्हा उपाध्यक्षा ममता भद्रे व राजेन्द्र कांबळे, माधव रिजितवाड, सचिन गजभारे, धम्मपाल ढवळे, सोनसळे आदी पदाधिकाऱ्यांसाह नायगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नायक सर ,व परिचारिका इतर कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!