अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनूस : अहमदनगर जिल्ह्यात गाजलेल्या संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साकूर पठार भागातील आदर्श सरपंच शंकरराव पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा सभापती पदी निवड झाल्याने साकुर येथील विरभद्र अपंग ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
राज्याचे माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी विकास मंडळाच्या पक्षाचे सर्व च उमेदवार मोठ्या मताधिक्याने बाजी मारत विजय संपादन केला. शंकरराव पाटील खेमनर यांनी या पूर्वी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती म्हणून चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि निर्मळ कामगिरी बजावत आपला ठसा उमटवत दुसऱ्यांदा सभापतीपदी बाजी मारली.
या वेळी उपस्थित विरभद्र अपंग अपंग संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सागर, जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ पुरी (गोसावी ), अहमदनगर जिल्हा पत्रकार युनूस शेख, युवा कार्येकर्ते शहानवाज मोमीन, आणि सामाजिक कार्येकर्ते दादाभाऊ खेमनर आदी मान्यवारांच्या उपस्थितीत शंकरराव खेमनर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.